पाचोऱ्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

 

पाचोरा (Pachora) येथील पोलिस कवायत मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार प्रविण चव्हाणके, गटविकास अधिकारी अतुल पाटील, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार रणजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, शिक्षणाधिकारी शिरीष जगताप, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, विजया विसावे, योगेश गणगे, पी. एस. आय. रामदास चौधरी, नगरपालिकेचे दगडू मराठे, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, सहकार विभागाचे दिपक पाटील, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे रमेश मोरे, कुणाल पाटील, सुरेश साळुंखे, पुरवठा अधिकारी अभिजित येवले, उमेश शिर्के, अव्वल कारकून भाऊसाहेब नेटके, भरत परदेशी, शरद वाडेकर, भरत पाटील, शेखर बोरुडे, उमेश वाडेकर, अमोल भोई, तलाठी आर. डी. पाटील, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. पाटील, एस. पी. बोरसे, कृषी सहायक शंकर धनराळे, उमेश पाटील, आर. ए. पाटील उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी आमदार किशोर पाटील यांचेकडून आदेश स्विकारला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी, व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याच्या धनादेशाचे वाटप
पाचोरा येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर तालुका पाच शेतकऱ्यांचे अपघाती निधन झालेल्याने त्यांचे वारस ज्योती रविंद्र मोरे (कुरंगी), सुषमाबाई सुनिल पाटील (निपाणे),अनिष युसुफ पठाण (अंतुर्ली खुर्द प्र.पा.), संजय धरमसींग पाटील (खेडगाव नंदीचे) व कल्पना कैलास पाटील (गाळण बु”) यांना प्रत्येकी दोन लाखांचे धनादेश, दादाभाऊ निंबा पाटील (घुसर्डी बु”) यांचे वारस ज्योतीबाई दादाभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांचा धनादेश व गेल्या पावसाळ्यात पाचोऱ्यात घरांची पडझड झालेल्या ९० लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार प्रविण चव्हाणके, कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.