“कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ऐश्वर्याला नाही”; अभिषेक बच्चन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘ऐश्वर्या राय’ (Aishwarya Rai) हीच नाव कानी पडताच तिचे सौंदर्य आणि अभिनय हे डोळ्यासमोर येते. आजही तिने भक्कम स्थान अभिनय कायम क्षेत्रामध्ये कायम ठेवले आहे. नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज झाला. अभिनयाच्या जोरावर तिने पुन्हा प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अनित्य ह्या चित्रपटाला दोनच दिवसात खूप जास्त प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिस (Box office) धमाल करताना दिसत आहे. साऊथ सोबतच या चित्रपटाला बॉलिवूड मध्ये हि जबरदस्त असे प्रेम प्रेक्षकांचे मिळतांना दिसत आहेत.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर होती. चाहते तिच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा पोन्नियिन सेल्वन 2 या चित्रपटाच्या माध्यमातून संपली असं म्हणायला हरकत नाही. ऐश्वर्या राय हिला अभिनय करताना पाहून चाहते खुश झाले आहेत. सर्वत्र ऐश्वर्या राय हिच्या अभिनयाचे काैतुक केले जात आहेत. सोशल मीडियावर बरेच चाहते तीच कौतुक करतांना दिसत आहे, पण काही जणांनी अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) निशाणावर घेण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकने सुद्धा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाला अभिषेक
अभिषेकला एकाने म्हंटले, कि आता तुम्हाला मुलीची काळजी घ्याल हवी, आणि ऐश्वर्या राय हिचा चित्रपट साईन करू द्या…. असे म्हंटले असता या कमेंटवर थेट अभिषेक बच्चन याने रिप्लाय करत जोरदार उत्तर देत चाहत्याची बोलती बंद केली आहे. अभिषेक बच्चन याने लिहिले की, चित्रपट साईन करण्यासाठीच नाही तर इतक कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ही ऐश्वर्या राय हिला अजिबात नाहीये आणि तिचे सर्वात आवडते काम अभिनय करण्यासाठी तर नाहीच…आता अभिषेक बच्चन याने केलेला या कमेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.