पाचोऱ्यातील महिलेची ऑनलाईन फसवणूक

0

पाचोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क
तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. कर्ज भरले नाही तर जादा व्याज लागेल, असा मोबाइलवर संवाद साधत महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना पाचोरा येथे उघडकीस आली असून याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योत्स्ना अशोक अहिरे (४२ रा. आदर्श नगर, पाचोरा) या महिलेला मोबाइलवर एक हिंदी भाषिकाचा फोन आला. त्यावर त्याने तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. तुमच्या कर्जाचा हप्ता व व्याज वाढेल. तेव्हा एक अॅप डाऊनलोड करा व त्यात माहिती भरा असे सांगून एका भामट्याने महिलेला अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या महिलेने अॅप डाऊनलोड करून माहिती भरली. यानंतर या महिलेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ७८ हजार ९०० रुपये काढण्यात आल्याचे कळले. यावरून पाचोरा पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.