धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६७ / ११ डाऊन पटरीजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११:३० वाजेच्या पुर्वी घडल्याने घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक तुषार विसपुते हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या सोबत घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला.

मयताचे अंदाजे वय ३५ वर्ष असुन मयत इसमाजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा आढळुन आला नाही. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयताचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयताच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भगवान बडगुजर घेत आहेत. मयताविषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.