सुदर्शन गांग बीजेएस रत्न पुरस्काराने सन्मानित

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुप्रसिद्ध सामाजिक, शैक्षणिक, आपत्कालीन आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेले सुदर्शन गांग यांनी केलेले कार्य आणि सेवा लक्षात घेऊन त्यांना भारतीय जैन संघटनेने प्रतिष्ठित बीजेएस रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या अधिवेशनात संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह सुमारे तीन हजारांहून अधिक लोकांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे अमरावतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर रोशन झाले आहे. भारतीय जैन संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या एकात्मतेबरोबरच सर्वधर्म समभाव, मानवसेवा, पशु-पक्ष्यांची सेवा, तसेच असंख्य उपक्रमांतून सेवा कार्य केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला. ते अभिनंदन बँकेच्या व्यवस्थापन मंडळावर आहेत. तसेच अनेक संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.

उदयपूरमध्ये सुदर्शन गांग यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, नीती आयोगाचे सदस्य विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी आणि गुलाबचंद कटारिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 35 वर्षांत पहिल्यांदाच असा पुरस्कार देण्यात आला. तसेच गुजरातच्या सुरेशभाई कोठारी यांना बीजेएस गौरवने सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.