पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची सभा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) जिल्हा सल्लागार समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य विधीतज्ञ एडवोकेट संभाजी जाधव, शासकीय रुग्णालयातील स्त्रिरोगतज्ञ डॉ. नम्रता अच्छा, बालरोग तज्ञ डॉ. अमोल शेठ, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी, ज्येष्ठ पत्रकार शांताताई वाणी, निवेदिताताई ताठे, रुग्णालयातील एडवोकेट शुभांगी चौधरी, संजय पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाभरातील नूतन तसेच नूतनीकरणासाठी ज्यांनी कायदेशीरबाबी व वैद्यकीय सूचना, नियम परिपूर्ण केल्या आहेत अशा सोनोग्राफी, टूडीईको, सिटीस्कॅन सेंटर आदींना मान्यता देण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. सोबतच जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्याकरिता जनजागृतीची गरज असल्याने समितीच्या सदस्यांनी इतर सामाजिक संस्था, लोकसभागातून कार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.