सैंधव मीठ आरोग्यासाठी गुणकारी ! होतील जबरदस्त फायदे

0

लोकारोग्य विशेष लेख

मिठाचे आपल्या आहारात अनन्यसाधारण म्ह्टव्ह आहे. मात्र जास्त मीठ खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. पण सैंधव मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आहारात सैंधव मीठाचा समावेश आहारात केला पाहिजे. तसेच सैंधव मिठात भेसळ नसल्याने उपवासाच्या दिवशी या मीठाचा वापर केला जातो. तसेच सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सैंधव मीठाला रॉक सॉल्ट म्हटले जाते. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारच्या पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते.

सैंधव मिठाचे फायदे

  • सैंधव मीठ हलके आणि पचनासाठी चांगले असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ सैंधव मीठामध्ये असल्याने शरीराला उर्जा मिळते.
  • सैंधव मीठाने रक्त परिसंचरण सुधारते. तसेच शरीरातील पीएच पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
  • जर वजन वाढले असेल तर आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होऊन शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.
  • केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर केल्याने केस गळती, केसांचे तुटणे कमी होते.
  • सैंधव मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने टॉन्सिल्सवर आराम पडतो. तसेच श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठे शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
  • गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवाने वाटते. वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.