आजपासून प्रवाशांसाठी RT-PCR अनिवार्य

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

इतर देशांमध्ये कोरोनाचा (Covid 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन जाहीर केल्या आहेत. भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार चीन (China), जपान (Japan), दक्षिण कोरिया (South Korea), हाँगकाँग (Hong Kong) आणि थायलंड (Thailand) येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात (India) दाखल होण्यापूर्वी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Min Dr Mandaviya) म्हणाले की, चीन, जपान, कोरिया आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या सर्व विमानांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच वरील पाच देशातून भारतात दाखल होणारी कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचेही मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.

विमानातून उतरताना प्रत्येक प्रवाशाला कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. विमानतळाच्या एंट्री पॉइंटवर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून, थर्मल स्क्रिनिंग दरम्यान प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला वेगळे करून उपचारासाठी पाठवले जाईल. संबंधित रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.