पाचोरा येथे अवैध वाळूचे वाहन पकडले ; एकाला अटक

0

पाचोरा ;- शहरातील प्रेम टी दुकानासमोर रोडवर ९ रोजी पाचोरा पोलिसांनी रात्री डिड वाजेच्या सुमारास टाटा हायवा कंपनीचे वाहन पकडून त्यात असलेली ९ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू पकडली . याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , ९ रोजी टाटा हायवा क्रमांक एम एच ४६ बीएफ ५०२१ या वाहनातून आरोपी फारूक भिकन चौधरी वय २९ रा. खडकी अंतुर्ली ता. पाचोरा हा रात्री दिड वाजेच्या सुमारास ९ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू अवैधरित्या पाचोरा शहरातून विना परवाना घेऊन जात असताना पोलिसांनी ७ लाख ९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून फारूक पिंजारी याला ताब्यात घेऊन पोहेकॉ सुपडू सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना नरेंद्र नरवाडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.