मुलींचे फोटो काढणाऱ्या रिक्षा चालकाला पब्लिक मार ; रिक्षाची तोडफोड

0

जळगावः येथील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यलयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त तरुणांनी रिक्षाची तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रिक्षाचालकाला पोलीसस्टेशनला नेण्यात आले .

रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली शिकत असून दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून – मुले-मुलींसाठी महाविद्यालयाची बस – नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे.
याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत काही दिवसांपासून तो महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे फोटो काढत असल्याची माहिती मिळाली . . त्यामुळे शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता काही तरुणांना माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकांचा मोबाईल तपासला. त्यात त्यांना आणखी काही मुलींचे फोटो दिसले. यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी त्याला चोप दिला. तसेच, त्याच्या रिक्षाची प्रचंड तोडफोड करून ती महाविद्यालयासमोरच उलटून दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यांनी रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.