तर मुलांनो आई वडील मतदान करीत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’- संजय बांगर

0

कळमनुरी ;- शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’, असे विधान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत.कळमनुरी विधानसभेतील लाख येथील विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी हा अजब सल्ला देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान संतोष बांगर पुढे बोलताना म्हणाले की,त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केली. तुमचे आई वडील जर दुसऱ्याला मतदान करत असतील तर दोन दिवस जेवायचं नाही, जोपर्यंत तुमचे आई वडील संतोष बांगर यांना मतदान करत नाही तोपर्यंत जेवण करायचं नाही, असा आगळा वेगळा सल्ला त्यांनी शाळकरी मुलांना दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.