तोरणाळा येथून चोरटयांनी ६५ हजारांचा ऐवज लांबविला

0

पहूर ता. जामनेर ;- तालुक्यातील तोरनाळा गावावातून अज्ञात चोरटयांनी दागिने आणि रोकडसह एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार ९ रोजी उघडकीस आळा असून याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , तोरणाला येथील सेवानिवृत्त शिक्षक शाळीग्राम त्र्यंबक पाटील वय ६४ हा. मु. चिंचवड वाल्हेकर वाडी जय मल्हार कॉलनी येथे वास्तव्याला असून ३० नोव्हेंबर ते ९ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ५० हजार किमतीची ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन , १५ हजार रोख असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने त्यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.