मोठी बातमी; अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कोलकत्ता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार मिथुन यांना अस्वस्थता जाणवत असल्याने आणि छातीत दुखत असल्याने कोलकत्ता येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज 10 फेब्रुवारी सकाळी अचानक मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागले, अशातच त्यांना अस्वस्थ जाणवत होते. त्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजून मिथुन यांच्या हेल्थ बाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

मिथुन हे विविध कार्यक्रमांमधून व चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सारेगमप या कार्यक्रमांमध्ये चीफ गेस्ट म्हणून मिथुन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मिथुन यांचा मुलगा नमाशीनं मिथुन यांच्यासाठी खास मेसेज पाठवला होता. तो मेसेज पाहिल्यानंतर मिथुन भावुक झाले. मिथुन चक्रवर्ती हे 73 वर्षांच्या आहे. तरी देखील ते त्यांच्या डान्सने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांचं मन जिंकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.