पाचोरा येथे महिलेचा विनयभंग ; एका विरुद्ध गुन्हा

0

पाचोरा ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेस लाकडी दांड्याचे वार करून दुखापत करत तिचे साडी फाडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 45 वर्षे महिलेस संशयित आरोपी जितेंद्र उत्तम चौधरी रा. सम्राट नगर अशोक नगर याने एक जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या रागातून महिलेच्या डोक्यावर उजव्या हातावर पंजावर पोटावर लाकडी दांड्याचे मारहाण करून दुखापत केली तसेच तिचे साडी  फाडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.