पाचोरा येथे एकास बेदम मारहाण करून लुटले ; सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा

0

पाचोरा ;- शहरातील जारगाव चौफुलीवर एकला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, पाचोरा शहरातील नाथनगर ,जारगाव येथे दीपक शामराव पाटील वय ४१ हे वास्तव्याला असून ते ड्रायव्हिंग करून आपला उदरनिर्वाह चालवितात. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी निलेश दिलीप नागणे ,शुभम,भैय्या (पूर्ण नाव गाव माहीत नाही) आणि इतर सात ते आठ जण यांनी दीपक पाटील यांना जारगाव चौफुली येथे चापट बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करून निलेश नागणे याने त्याच्याजवळील फायटरने डोक्यावर मारून दुखापत केली.  १५ ग्राम वजनाची चैन बळजबरीने तोडून आरोपी शुभम आणि भैय्या यांनी खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आरोपी निलेश याने आमच्या नादि लागल्यास आणि पोलिसांकडे फिर्याद दिल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिली . दीपक पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठून आरोपींविरुद्ध फिर्याद दिल्यावरून भादंवि ३९४,३९५,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बलटे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.