लोकशाही न्यूज नेटवर्क
दिनांक 6/10/2023 म.उपवनसंरक्षक जमीर शेख, म.सहाय्यक वनसंरक्षक चोपडा, प्रथमेश हाडपे, तसेच वनपरिक्षेत्र अधि. बी के थोरात यांच्या मार्गदर्शनाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा वैजापूर येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. प्रसंगी विजय शिरसाठ वनरक्षक यांनी ppt द्वारे विद्यार्थ्यांना आपले सरपटणारे मित्र साप या विषयांवर, snake food chain, विषारी, बिनविषारी, निम्म विषारी यांची ओळख करून दिली. तसेच सर्प दंश न व्हावा यासाठी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार, तसेच सर्प दंश झालेल्या व्यक्तीच्या अवयवास क्रेप ब्याडेज कसा बांधावा याबाबत सादरीकरण केले. चुनिलाल कोळी वनरक्षक व वंदना बारेला वनरक्षक तसेच सुरेखा सोनवणे यांनी विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक करून दाखवले, तरी प्रसंगी आय एस तडवी वनपाल वैजापूर यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
तसेच दु: दादासो सुरेश पाटील उच्च माध्यमिक आश्रम शाळा कर्जाने येथे सदर ppt व वन्यजीवांचे सातपुड्यातील व्हिडीओग्राफी विद्यार्थ्यांन समोर सादरीकरण करण्यात आले. संदीप भोई वनपाल कर्जाना (अति कार्य), श्रीमती ज्योती बारेला वनरक्षक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना लाभले. सदरच्या वन्यजीव सप्ताहासाठी निखिल पाटील, बाळू बारेला, शबाना तडवी मॅडम, श्वेता मॅडम, विजय जाधव, वसंत महाजन, योगेश चौधरी, विकास पाटील यांचे सहकार्य लाभले.