छत्रपती संभाजी नगरमध्ये पाणी प्रश्न पेटला

0

लोकशाह न्यूज नेटवर्क

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं आहे. जालना-संभाजीनगर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केलं आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंदारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रोड गेल्या २ तासांपासून रोखला आहे. या सर्व आंदोलोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन तासांपासून हे आंदोलन सुरु आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कल्याण काळे हे नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यासह आजी-माजी आमदार देखील या आंदोलनाला उपस्थित होते.

जवळपास २० ते २२ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रॉड गेल्या २ तासांपासून रोखला आहे. रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको करण्यात आलं आहे. रास्तारोकोमुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.