हिवाळ्यात घ्या तेलकट त्वचेची अशापद्धतीने काळजी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिवाळा आला की, गुलाबी थंडीसोबतच आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या काळात सर्दी-खोकल्याच्या आजारासह त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात. बहुतांश लोकांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय तेलकट असते.

कितीपण महागले क्रिम लावा किंवा योग्य प्रकारे ट्रीटमेंट घ्या. त्वचा तेलकट तर होतेच पण त्याचबरोबर ती चिकट होतांना दिसून येते. या ऋतूमध्ये कोरड्या त्वचेसह तेलकट त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कशापद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो.

1. त्वचा साफ करणे

त्वचा तेलकट असल्यास किमान दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेसाठी क्लिंजरचा नियमित वापर करावा. यामुळे त्वचेवर जमा झालेली अतिरिक्त तेल निघून जाते.

2. टोनर

चेहरा धुतल्यानंतर टोनरचा वापर करा. यामुळे त्वचेचे पीएच पातळी योग्य राहण्यास मदत होते. गुलाबजलचा देखील टोनर म्हणून आपण वापर करू शकतो.

3. सनस्क्रीन

सनस्क्रीनचा वापर फक्त उन्हाळ्यात नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये करणे गरजेचं आहे. सनस्क्रीनचा त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवण्यात मदत करते.

4. मॉइश्चरायझर

मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करते. पण जर त्वचा तेलकट असेल तर जेल मॉइश्चरायझरचा वापर चांगला ठरतो. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकून राहिल.

5. फेसपॅक

कोरफड, चंदन आणि मुलतानी माती एकत्र करुन त्याचा फेसपॅक त्वचेला लावल्यास फायदा होईल. यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका होईल. त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.