Saturday, January 28, 2023

आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे निधन

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय 46) यांचे आज दि.12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि 12 रोजी दुपारी 4 वाजता मारवड राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांचे ते गेल्या अनेक वर्षांपासून स्विय सहायक होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोतावळा जमविला होता. त्यांच्या अकस्मात निधन वार्तेमुळे अनेकांना धक्का बसला असून संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे