विजेच्या धक्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

धानोऱ्यापासून जवळच असलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील हे डिपी चालु करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महावितरण कंपनीकडुन थकीत विज बिल वसुली करण्यासाठी डिपी वरुन विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. या डीपीवर विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी सकाळी आठ वाजता दत्तू पाटील गेले असता त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र विजवितरण कंपनीचे अधिकारी तब्बल अकरा वाजता आल्याने नागरिकांचा संताप आनावरण झाल्याने चक्क पोलिसांसमोरच अधिकाऱ्यांना मारहाण केली. पोलिस घटनास्थळी येवून थांबले होते. मात्र सदर घटना सकाळी आठ वाजता घडली याची माहिती देऊनही विजवितरणचे अधिकारी उशीरा आल्याचा आरोप करत धानोरा विजवितरण सहाय्यक अभियंता डी. डी. घरजारे व चोपडा विभागीय अभियंता एन. एस. रासकर हे ११ वाजता घटनास्थळी आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना मारहाण सुरू केली.

यावेळी पोलीस व सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करत समजवल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत अडावद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर घटनेचा पंचनामा हे. कॉ. सुनिल तायडे व पो.कॉ. जयदीप राजपूत यांनी केला. तर मयत दत्तु पाटील यांच्या मृतदेहाचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.