जवानाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १३ हजार ९५८ रूपयांत ऑनलाईन गंडवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २९ जानेवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित राजाराम पाटील (वय २९, रा. शिरसोली ता. जि. जळगाव) हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीला आहे. रोहीत पाटील हे २८ जानेवारी रोजी शिरसोली येथे घरी असतांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना एक मॅसेज आला. मॅसेजनुसार त्यांनी एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि त्यात डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड आणि पासबुकचे फोटो अपडेट केले.

दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीविना बँक खात्यातून १३ हजार ९५८ रोकड परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.