Saturday, January 28, 2023

हृदयविकाराचा झटका येऊन अमळनेर रेल्वे स्थानकावर एकाचा मृत्यू…

- Advertisement -

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भुसावळवरून नंदुरबारला जातांना अमळनेर रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका येऊन फैजपूर येथील 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

कय्युम अयुब खान (40) रा. फैजपूर मिल्लत नगर आणि त्याचा मित्र अर्शद याच्यासोबत गुरुवारी सकाळी ८ वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकातून नंदुरबारकडे जात होता. धरणगाव जवळ कय्युमला छातीत दुखू लागले. अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिक त्रास झाल्याने त्याचा मित्र अर्शद याने त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. काश ताडे यांनी तपासून मृत घोषित केले. अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे