मनवेल येथील शेतकरी पीएम किसान सन्मान अनुदानाच्या प्रतिक्षेत

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

दगडी  व मनवेल गावातील शेतकरी प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झाला नसल्यामुळे शेतकरी बँकेत चक्कर मारीत असुन निधीची प्रतिक्षा करीत आहे.

प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा होतात. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पास बुकची झेराँक्स, ऑनलाईन आधार लिंक करुन केवायसी केले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ ऑक्टोबर २२ रोजी बारावा हप्ता जमा झाला आहे. काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसल्यामुळे  शेतकऱ्यांनी यावल तहसील कार्यालय गाठुन आपली कैफीयत सांगितले असून हप्ता तांत्रिक अडचण सांगून लवकर पडेल असे सांगितले आहे.

दगडी व मनवेल गावातील  शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सन्मान योजनेत पात्र असुन काही शेतकऱ्यांना निधीचा लाभ खात्यावर जमा झाला तर काही शेतकरी अद्यापही वंचित आहे.

प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या निधी राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा झाला आहे. इतर बँकेच्या खात्यावर नीधी जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी निधीच्या प्रतिक्षेत आहे.

शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी करुन आधार लिंक केले काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा बारावा हप्ता  मिळाला नाही. मात्र अद्यापही उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.