भुजबळांना मी संताजी धनाजी सारखा दिसतोय ; जरांगे पाटलांची टीका

0

छत्रपती संभाजीनगर :;- भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली असून हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी सभेला काही तासांत सुरुवात होण्यापूर्वी हे वक्तव्य केले आहे.

आज हिंगोलीत ओबीसी मेळावा होत असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीस आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी हि सभा होत आहे. मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असून, त्यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे?, संताजी-धनाजी सारखा मिच दिसतोय. जसे संताजी, धनाजी पाण्यात दिसत होते, तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान हिंगोलीत होत असलेल्या सभेवर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की, “लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे कामच खूप आहे, त्यामुळे आजची सभा बघणार नाही. लोकं खुप भेटायला आले आहे. सलाईन लावले आहे, आज उद्या उपचार घेणार आणि त्यानंतर आंतरवालीत आंदोलना ठिकाणी जाईल, असे जरांगे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.