नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या

0

जळगाव :रुममध्ये एकटीच असलेल्या शासकीय परिचारिका चे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षात असलेल्या करुणा संतोष बोदडे (वय २२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) या विद्यार्थीनीने मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

तरुणीने अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे तिच्या मैत्रीणींसह कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील वढोदा येथे राहणारी करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्याघेत होती. दिक्षीतवाडी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये ती अन्य तीन मैत्रीणींसह रुम करुन राहत होती. तिच्या मैत्रिणी गुढीपाडव्यानिमित्त गावाकडे सुरतेवर घेल्या होत्या . खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरल्याचे तिच्या घरमालक असलेल्या वृद्ध महिलेने सांगितले.दरवाजा उघडताच दिसला मृतदेह रविवारी संध्याकाळी करुणाची रुम पार्टनर असलेली एक मैत्रिण जळगावात आली.

त्या वेळी तीने रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तीने ही बाब घरमालक असलेल्या महिलेला सांगितली. त्यांनी त्या खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता, त्यांना करुणा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

दिसल्याने त्यांना धक्काच बसला. घर मालकाने घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख, एपीआय मोरे, जुबेर तडवी, अमित मराठे, युनूस तडवी, नरेंद्र दिवेकर यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

महिन्यांपुर्वीच सुरत येथे होमगार्ड असलेल्या तरुणासोबत तीचा साखरपुडा देखील झाला आहे. त्यानंतर तीने गळफास सारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.