दिव्यांग तरुणाची रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

0

जळगाव :- कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला . यापरप्रकणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.

भगवान मणिलाल चौधरी (वय २६, रा. वडनगरी, ता. जळगाव) असे मयत दिव्यांग तरुणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हा तरुण कुटुंबियांसह वासतव्यास होता. दोन्ही पायांनी दिव्यांग असतांना देखील तो टेन्ट हाऊस चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा . शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता शहरातील समृध्दी अपार्टमेंटसमोरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे समोर स्वतःला झोकून देत त्याने आपली जीवनयात्रा संपवली. तरुणाच्या आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई निर्जला, वडील माणिलाल गंभीर चौधरी आणि लहान भाऊ पवन असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.