भोईटे नगरात वृद्धाच्या घरातून चांदीचे भांडे चोरले

0

जळगाव : शहरातील भोईटे नगरात ६५ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भोईटे नगरात प्रदीप एकनाथ अरकडी (वय ६५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दि. १० फेब्रुवारी ते दि. १ एप्रिल दरम्यान त्यांचे घर बंद होते.याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरातून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रदीप अरकडी यांनी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.