जळगावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार

चौघुले प्लॉट परिसरात घडली

0

जळगाव :- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत राहुल ताराचंद गुरव याने पत्नी ममता गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून राहा गुरव यांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील ममता राहुल गुरव या विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती काहीही कामधंदा करीत नसल्याने विवाहिता एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. विवाहितेचा पती हा वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण देखील करीत होता. दि. ५ एप्रिल रोजी ममता गुरव यांच्या पतीने रात्री ११ वाजता विवाहितेसोबत भांडण करण्यास सुरुवात केली.

राहूल गुरव याने अंथरुनात लपवून ठेवलेली सुरी काढून विवाहीतेच्या चेहऱ्यावर वार करण्यास सुरुवात केली. विवाहितेने त्यांचा हल्ला अडविण्याचा प्रयत्न केला असता, विवाहितेच्या हाताला व मानेला वार झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

गल्लीतील काही लोकांना आवाज दिला. त्यांनी गुरव यांच्याघराकडे धाव घेतल्यानंतर विवाहिता रक्तबंबाळ अवस्थेत त्याठिकाणी पडलेल्या होत्या. त्यांनी विवाहितेला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

विवाहितेवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार झाल्यानंतर विवाहितेने शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित राहुल गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल गुरव याला अटक केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.