ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला साडेबारा लाखांचा गंडा

0

जळगाव :- ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवित खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांनी १२ लाख ६७ हजारामध्ये फसवणुक केली. ही घटना उघउकीस आल्यानंतर ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

शहरातील योगेश वसंत हेबाळकर (वय ५४, रा. आदर्शनगर) हे एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. योगेश हेबाळकर यांच्या व्हाटसअॅप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना ट्रेडिंग गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून दि. १८ डिसेंबर २०२३ ते दि. ७ मार्च २०२४ या दरम्यान वेळोवेळी एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यावर स्वीकारले. त्यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कमही दिली नाही.

वारंवार पाठपुरावा करून आपली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हेबाळकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एका इंस्टीट्युशनच्या व्हाटसअॅप क्रमांकासह अन्य दोन अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.