विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरला

0

– विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममधून ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश भिकू मालसुरे (वय-१९) रा. नवी मुंबई हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांचे होस्टेल येथे राहत असून ३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतून ४५ हजार रुपये किमतीचा विस्टन कंपनीचा लॅपटॉप आणि चार्जर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या संदर्भात जयेश मालसुरे या विद्यार्थ्याने सोमवारी ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.