अमळनेरातून दोन भामट्यानी महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

0

अमळनेर ;- शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र दोन भामट्यांनी दुचाकीवर येऊन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सोमवारी ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमलता नामदेव शिंपी (वय-४५) रा. मुंदडा नगर अमळनेर या २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी बगीच्या जवळून पायी जात होत्या. त्याचवेळी अज्ञात दोन भामटे दुचाकीने मागून आले. विवाहितेच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी बळजबरी हिसकावून पसार झाले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवार ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.