विद्यापीठाच्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

0

जळगाव  :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ च्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला शन‍िवार दिनांक २३ मार्च रोजी अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात १९.५५ कोटी रूपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सविस्तर अर्थसंकल्पीय अभिभाषण करतांना विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेत मागील अर्थसंकल्पातील तरतूदींचा मागोवा देखील घेतला. सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प ३०८.०३ कोटींचा होता. गतवर्षी २४.३० कोटींची तूट दर्शविण्यात आली होती. विभागवार आढाव्यानंतर सुधारित म्हणून १५.९८ कोटी तूटीचा सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाचा फुगवटा कमी करणे हा दृष्टीकोन समोर ठेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.

यंदाचा अर्थसंकल्प २८९.१६ कोटी रु. एवढा असून तूट १९.५५ कोटी रु. एवढी आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत तूट ४.७५ कोटींनी कमी झाली आहे. या अर्थसंकल्पात परिक्षणासाठी १९६.४६ कोटी, योजनांतर्गत विकासासाठी ४३.५१ कोटी आणि विशेष कार्यक्रम/योजनांसाठी ४९.१९ कोटी तरतूद आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अमोल मराठे व प्रा.एकनाथ नेहेते यांनी दिलेल्या कपात सूचनेअंती चर्चा झाल्यानंतर त्यांनी कपात सूचना मागे घेतली. अर्थसंकल्पावर सदस्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर सभागृहाने अर्थसंकल्पाला मान्यता दिली. त्याआधी प्रश्नोत्तरांचा तास झाला. या तासात दीपक पाटील, अमोल मराठे व द‍िनेश चव्हाण, दिनेश खरात यांच्या प्रश्नांना सीए. रवींद्र पाटील, अमोल पाटील, प्रा. अनिल डोंगरे यांनी उत्तरे दिली.

अधिसभेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यावेळी उपस्थित होते. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले. या बैठकीला प्राचार्य एस.एस.राजपूत, प्रा.एस.टी.भूकन, प्रा.जगदीश पाटील, प्रा.योगेश पाटील,विजय आहेर, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.दिनेश पाटील, प्रा.आशुतोष पाटील, प्राचार्य संजय सुराणा, प्राचार्य के.बी.पाटील, प्राचार्य सखाराम पाटील, प्राचार्य इंद्रसिंग पाटील, एस.टी.पाटील, विलास जोशी, प्रा.एकनाथ नेहते, प्रा. संदीप नेरकर, प्रा.शिवाजी पाटील, प्रा.गजानन पाटील, प्रा.जयवंत मगर, डॉ.मंदा गावीत, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. वर्षा पाटील, डॉ.पद्माकर पाटील, प्रा.धीरज वैष्णव, प्रा.विशाल पराते, प्रा.किर्ती कमलजा, अमोल पाटील, अमोल मराठे, अमोल सोनवणे, नितीन झाल्टे, दिनेश चव्हाण, दिनेश खरात, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, केदारनाथ कवडीवाले, भानूदास येवलेकर, नरेंद्र नारखेडे, ॲङ केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, मिनाक्षी निकम, दीपक पाटील, सुरेखा पाटील, ऋषीकेश चित्तम उपस्थित होते. सर्व सदस्यांनी विविध विषयांवर तसेच अर्थ संकल्पावरील चर्चेत भाग घेऊन काही उपयुक्त सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.