विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त झाले, तर विज्ञान गटात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १२ ते १५ जानेवारी या कालावधीत १६वी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ४८ विद्यार्थ्याचा संघ सहभागी झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील पीपीटी सादरीकरणासाठी १७ विद्यार्थ्यांची निवड झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयातील पदव्यूत्तर गटात उत्कर्ष भामरे (एच आर पटेल इन्स्टियुट ऑफ फार्मास्युटीकलद एज्युकेशन, शिरपूर) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने नॅनो रोबोट या विषयावरील संशोधन सादर केले. विज्ञान विषयातील पदव्युत्तर गटात तन्मय बच्छाव (जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) याने सादर केलेल्या टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी साहित्य या संशोधनाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. याशिवाय विज्ञान गटातील सर्वसाधारण विजेतेपद देखील विद्यापीठाला प्राप्त झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात हिमानी महाजन या विद्यार्थिनीने सादर केलेल्या नृत्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या संघासोबत समन्वयक म्हणून प्रा.जयदीप साळी, संघव्यवस्थापक म्हणून डॉ.विकास गिते व डॉ.प्रिती सोनी होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी संघाचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.