आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने पटकावले ४ सुवर्ण ,१ कांस्य

0

जळगाव ;- नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने ४ सुवर्ण आणि १ कास्य पदक प्राप्त करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे दि.१२ ते १६ जानेवारी या दरम्यान २५वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव झाला. या महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची कामगिरी लक्षणीय ठरली. विद्यापीठाने ४ सुवर्ण पदक प्राप्त केले यामध्ये ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रिंकी पावराने (जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार) व श्वेता ठाकूर (एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय,धुळे) हिने लांब उडी स्पर्धेत प्रथम, शुभम पाटेकर (एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय,धुळे) याने लांब उडीत प्रथम व प्रथमेश देवरे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर) याने ८०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या चार सुवर्णपदका शिवाय राजवंत गुप्ता (एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय,धुळे) याने उंच उडी स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. विद्यापीठाला प्रथमच चार सुवर्णपदक प्राप्त झाले.

संघाच्या या यशाबददल कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी अभिनंदन केले. संघासोबत प्रशिक्षक म्हणून प्रा.शैलेश पाटील, प्रा.व्ही.के.पाटील व क्रिडासंचालक डॉ.दिनेश पाटील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.