लिंगभाव संवेदनाशीलता संकल्पनेत अनेक बारकावे – प्रा. मुक्ता महाजन

0

जळगाव ;– लिंगभाव संवेदनाशीलता ही संकल्पना दिसते तेवढी सोपी नाही. यात अनेक बारकावे आहेत ते समजून घेतल्याशिवाय स्त्री आणि पुरूष यांच्यातील जडण-घडण आणि त्यांची भूमिका आपल्याला समजून घेता येणार नाही. तसेच निसर्गत: स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये स्वीकारून आपल्याला त्यांच्यात समानता प्रस्थापित करून लिंगभाव संवेदनशीलता रूजवता येणार नाही असे प्रतिपादन प्रा. मुक्ता महाजन यांनी केले.

भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या संचालिका प्रा. मुक्ता महाजन यांनी ‘’लिंगभाव संवेदनशीलता” या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आत्मनिर्भर युवती अभियान” राबविण्यात येत आहे.

या कार्यशाळेच्या दुस-या सत्रात सायबर गुन्हे शाखेतील पोलीस नाईक श्री. सचिन सोनवणे यांनी “सायबर विश्वातील गुन्हे आणि महिलांची सुरक्षा” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्री. सोनवणे म्हणाले की, ऑनलाईन माध्यमातून विविध समाज माध्यमे वापरत असतांना कोणती काळजी घेतली पाहिजे व आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरप्रकार होऊ नये या सुरक्षेसाठी कोणती उपाय केले पाहिजे तसेच आपण कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यात अडकणार नाही किंवा आपली ऑनलाईन पध्दतीने आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या संदर्भात त्यांनी सायबर गुन्हे शाखेत दाखल झालेल्या विविध तक्रारींची उदाहरणे देवून सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.