स्पॅम कॉल्सना कंटाळले असाल, तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून भारतातील नागरीकांना येणाऱ्या स्पॅम कॉल्समध्ये वाढ झाली आहे. याबाबत आता केंद्र सरकारनेच नागरिकांना एक इशारासुद्धा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणारे फोन घेताना खबरदारी घ्यावी असा सल्ला सरकारच्या दूरसंचार विभागाने दिला आहे. सरकारने एका प्रेस रिलिजमधून सर्व दूरसंचार कंपन्यांना देखील याबाबत निर्देश दिले आहे. विदेशातून येणाऱ्या स्पॅम कॉल्सना ब्लॉक करण्यास कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. तसाच नागरिकांनी देखील असे कॉल वारंवार येत असल्यास तातडीने तक्रार दाखल करावी असंही यात म्हंटल आहे.

सरकारचा इशारा
भारतीय शेअर बाजाराबाबत चुकीची माहिती पसरवणारे कित्येक स्पॅम कॉल्स नागरिकांना येत आहे. यासोबतच नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी काही राष्ट्र-विरोधी तत्वे असे कॉल्स करत असल्याचंही मंत्रालयाने म्हंटल आहे.

या ठिकाणी करता येईल तक्रार

तुम्हाला जर भारतीय क्रमांकावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स येत असतील, तर संचार साथी या पोर्टलवर जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल

१) संचार साठी वेबसाईटवर गेल्यास ‘रिपोर्ट इंटरनॅशनल कॉल’ हा पर्याय निवडा

२) नंतर तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर कॉल आला होता तो एंटर करा

३) यानंतर कॉलची तारीख आणि वेळ एंटर करा.

४) त्यानंतर ज्या देशातून फोन आला होता त्या देशाचं नाव एंटर करा. (हे अनिवार्य नाही.)

५) यानंतर या कॉलबाबत इतर माहिती देऊन ओटीपी व्हेरिफिकेशन कम्प्लीट करा.

Leave A Reply

Your email address will not be published.