नववर्षात साईचरणी तब्बल १६ कोटींचे दान

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये देशभरासह परदेशी लाखाे भाविक शिर्डीत दाखल होतात. नववर्षात भाविकांनी साई बाबा यांचे दर्शन घेत तब्बल १६ कोटी रुपयांचे दान साईंच्या चरणी अर्पण केले. साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांनी याबाबतची माहिती दिली.

तुकाराम हुळवले यांनी दिलेल्या माहितीनुसार,  23 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत 8 लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. या दहा दिवसांच्या कालावधीत जवळपास 16 कोटींचे दान प्राप्त झाले आहे. यामध्ये दानपेटीत 7 कोटी 80 लाख प्राप्त झाले आहेत. याबराेबरच देणगी काऊंटरमध्ये 3 कोटी 53 लाख, ऑनलाईन देणगीतुन तब्बल 4 कोटी 21 लाख तसेच 32 लाख रूपयांचे सोने तर 7 लाख 67 हजार रूपये किमतीची चांदी भाविकांनी अर्पण केली आहे.

विविध माध्यमातून एकुण 15 कोटी 96 लाख रूपयांचे भरभरून दान मिळाले आहे. सुमारे 6 लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला आहे. तसेच 11 लाख लाडू पाकीटांची विक्री देखील झाली आहे. याबराेबरच 7 लाख 46 हजार भक्तांना मोफत बुंदी पाकीट वाटल्याचे हुळवलेंनी नमूद केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.