धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन

0

जळगाव.;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते होणार आहे.

सेमीकंडक्टर चीप निर्मिती क्षेत्रात संशोधन व रोजगाराच्या दृष्टीने प्रशिक्षणासाठी विद्यापीठाची ही प्रयोगशाळा (१००० क्लीन रुम) सज्ज झाली आहे. भौतिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.ए.एम.महाजन व त्यांचे संशोधक विद्यार्थी यांनी ही प्रयोगशाळा तयार केली असून ३ कोटी रुपयांच्या अनुदानातून, १० संशोधन प्रकल्पांच्या अनुदानातून सेमीकंडक्टर वेफर फॅब्रीकेशन प्रयोगशाळा प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे यात उपलब्ध आहेत. रुसाच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी या प्रयोगशाळेसाठी उपलब्ध झालेला आहे.

उद्या रविवारी दुपारी २ वाजता भौतिकशास्त्र प्रशाळेत या प्रयोगशाळेचे उद्धाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य समारंभ सिनेट सभागृहात होणार असून कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ.के.बी.पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती राहणार आहे. याच समारंभात कौशल्य विकास केंद्राच्या माहितीपत्रकाचे विमोचन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (ऑनलाईन) केंद्राचे उदघाटन देखील होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.