कॅनडामध्ये विमान अपघातात २ भारतीय शिकाऊ पायलटांचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात घडला असून यामध्ये दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. या विमानात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यावर अपघात झाला. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते, त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, विमान एका झाडावर आदळले, त्यानंतर संतुलन बिघडल्याने हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळलं. या दुर्घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांची नावे अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत. हे दोन्ही भारतीय मुंबई येथील रहिवासी होती. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरु आहे.

कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु
याबाबतची माहिती मृतांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने सखोल तपासासाठी घटनास्थळी पथक पाठवलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.