ब्रेकिंग; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपत घेतली आहे. २४ वर्षांमध्ये ९ वेळा शपत घेणारे ते एकमेव नेते ठरले आहे. भाजपचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलं आहे. या दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांच्यानंतर शपथ घेतली आहे.

नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आहे. नव्या सरकारला जीतनराम मांझी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे चार आमदार आहेत.

आज शपथ घेणारे मंत्री

१) सम्राट चौधरी (भाजप)

२) विजय कुमार सिन्हा (भाजप)

३) डॉ. प्रेम कुमार (भाजप)

४) विजय कुमार चौधरी (जेडीयू)

५) बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)

६) श्रावण कुमार (जेडीयू)

७) संतोष कुमार सुमन (HAM)

८) सुमित कुमार सिंग (अपक्ष)

Leave A Reply

Your email address will not be published.