बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे आज मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) निधन झाले आहे. त्यांना याच महिन्यात हृदयविकाराचा झटका बसला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते.

नितीन मनमोहन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे सुपुत्र होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘बोल राधा बोल’ (Bol Radha Bol), ‘लाडला'(Laadla), ‘दस’ (Dus), ‘रेडी’ (Ready) यासारखे त्यांचे काही चित्रपट सुपरहिट झाले होते. मनमोहन यांची ‘ब्रम्हचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ यासारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.