भारतीय कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या कफ सिरपचे (Cough Syrup) सेवन केल्यामुळे उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. उझबेकिस्तानने (Uzbekistan) आरोप केलेली कंपनी ही मूळची भारतीय असून तिचे नाव मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (Marion Biotech Private limited) असे आहे. उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली या कंपनीची नोंद करण्यात आली होती.

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, मुलांचा मृत्यू का झाला असावा. मृत्यू झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप (Dok-1 Max Syrup) देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले. हे औषध प्रमाणापेक्षा जास्त आहे’.

तसेच या सायरपमध्ये पॅरासिटॉमॉल हा मुख्य घटक आहे. डॉक-१ मॅक्स सायरपचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. सर्दीवरील उपाय म्हणून डॉक्टरांनी सुचवलेले नसताना फक्त औषध विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार हे औषध देण्यात आले. याच कारणामुळे मुलांची प्रकृती खालावली असल्याचे देखील या निवेदनात दिले आहे.

या घटनेनंतर मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड औषधनिर्मिती कंपनीने निष्काळजीपणा तसेच दुर्लक्ष केल्याचा ठपका कर्मचाऱ्यांवर करण्यात आला असून सात कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.