WTC फायनलपूर्वी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

“जर्मन स्पोर्ट्स ब्रँड” Adidas आता भारतीय संघाचा किट प्रायोजक बनला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. आता भारतीय संघाच्या जर्सीवर ADIDAS चा लोगो दिसणार आहे. असे बोर्डाचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की BCCI ने किट प्रायोजक म्हणून adidas कंपनीशी करार केला आहे. आम्ही क्रिकेटला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आता जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी जोडले गेल्याने आम्हाला आनंद होत आहे.”

 

View this post on Instagram

A post shared by adidas India (@adidasindia)

टीम इंडियाचे खेळाडू एडिडास लोगोची जर्सी घालून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सराव करत आहेत, ज्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. पण आता टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरसोबतच आता टीम इंडियासाठी वनडे, टी-२० आणि टेस्ट या तिन्ही फॉरमॅटची नवी जर्सी समोर आली आहे.

खुद्द आदिदासने त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. न्यू जर्सीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टीम इंडिया आता तिन्ही फॉरमॅटमध्ये Adidas (Team India Adidas Jersey) लोगो असलेली जर्सी खेळताना दिसेल आणि सर्व प्रथम टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023 फायनल) मध्ये ती परिधान करताना दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.