जळगावात पोलीस आयुक्तालय आणि भव्य स्टेडियमची निर्मिती होणार – ना. गिरीश महाजन

0

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून २५ एकर जागेत भव्य अद्द्ययावत स्टेडियमची निर्मिती होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि क्रीडामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. केंद्रातील मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, खा. उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश चिटणीस अजय भोळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले कि, जळगाव येथे पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरु असून येत्या एक दोन महिन्यात याला मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक याठिकाणी असणाऱ्या अद्ययावत स्टेडियमसारखे स्टेडियम जळगावात होणार आहे यासाठी १५ कोटी मंजूर झाले आहे. तसेच या स्टेडियमची १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्न मांडला असून यावर योग्य निर्णय होऊन त्यांना रास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे कामे अतिशय वेगाने सुरु असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विशावास त्यांनी व्यक्त केला. फुटबॉल हा विश्वात सगळ्यात लोकप्रिय खेळ असून महाराष्ट्रात या खेळा प्रोत्साहन मिळावे यासाठी विभागनिहाय संघांमधून २० खेळाडूंची निवड करून फुटबॉल साठी चांगले वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. जनधन योजना, कलम ३७० , रेशन योजना प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची उभारणी यासारखे विषय सरकारने मार्गी लावले असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.