खिलाडी कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बाॅलिवूडचा (Bollywood) खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षातून तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार हा आपल्या फिटनेसवर खास लक्ष देतो. २५ आॅक्टोबर २०२२ ला अक्षय कुमार याचा राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांचा भेटला नाही. त्यापूर्वी रक्षा बंधन आणि सम्राट पृथ्वीराज हे अक्षय कुमार याचे चित्रपट (Movie) रिलीज झाले होते. याही चित्रपटांना बाॅक्स आॅफिसवर काही विशेष धमाल करण्यात यश मिळाले नाही.

सोशल मीडियावर सध्या अक्षय कुमार हा प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. अक्षय कुमार याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्याला लोकांच्या टिकेचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फक्त तो एकटाच नसून अजूनही काहीजण आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अक्षय कुमार हा जगाच्या अॅनिमेटेड ग्लोबवर चालताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार हा भारताच्या नकाशावरून चालताना दिसत आहे. याच कारणामुळे अक्षय कुमारला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

मुळात म्हणजे अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ एअरलाइनच्या (Airline) जाहिरातीसाठीचा आहे. मात्र, यामध्ये अक्षय कुमार हा भारताच्या नकाशावरून चालत असल्याने तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोल होताना दिसत आहे.अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अक्षय कुमार याला बऱ्याच गोष्टी सुनावल्या आहेत. एका युजर्सने लिहिले की, भाऊ…थोडातरी आमच्या भारत देशाचा आदर करा…दुसऱ्याने लिहिले की, हे काय आहे…थोडेतरी लाज वाटू दे , एका युजर्सने तर या व्हिडीओवर कमेंट करत थेट अक्षय कुमार याला देशद्रोही म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.