मुंबईचे विमानतळ स्फोटाने उडविण्याची धमकी !

0

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन करून धमकी दिली. विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू अशी धमकी या माथेफिरूने दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असं आपलं नाव सांगितलं आहे. तो स्वत: ला इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचं सांगत आहे.

फोनवर धमकी दिल्यानंतर त्याने तो कोडवर्डमध्ये बोलत होता. त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.