ट्रॅक्टर उलटून दाबल्याने चालकाचा मृत्यू

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते उलटल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला तर तीन ते चार मजूर जखमी झाले . जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे.

राजेंद्र मगरे (३५, रा.निमगाव, ता.जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. राजेंद्र मगरे हे ट्रॅक्टरमध्ये विटा घेवून जामनेर येथे गेले असता सायंकाळी विटा पोहचवून ट्रॅक्टर घेऊन परतत होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उमाळा-धानवड रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर उलटल्याने या ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक राजेंद्र मगरे हे गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर मजुरही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेवून जखमींना रूग्णालयात उपचारार्थ हलविले. तर राजेंद्र मगरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.