शेंदुर्णीत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेगाव येथील ब्रम्हांड नायक श्री. संत गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, कीर्तन, प्रवचन पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री. संत गजानन महाराज चौकात करण्यात आले आहे.

दि.९ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी ८ वाजता श्री. संत गजानन महाराजांच्या मुर्तीला अभिषेक व पादुकांचे पुजन रात्री ८ वाजता श्री. संत गजानन महाराज महिला मंडळ यांची भजन संध्या शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रात्री ८ वाजता ह.भ.प.भागवत महाराज हिवाळे यांचे जाहीर कीर्तन, दि.११ फेब्रुवारी शनिवार रात्री ८ वाजता ह.भ.प.रामेश्वर महाराज शेंदुर्णी यांचे जाहीर किर्तन होणार असुन यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांची साथसंगत लाभणार आहे.

रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता संत गजानन महाराज यांच्या बावन्नीचा कार्यक्रम होईल तर दि.१३ फेब्रुवारी सोमवार रोजी श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता प्रतिमेची व पादुकांची शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक निघणार असुन तदनंतर महाआरती होईल. दुपारी ४ वाजता श्री. विजय ग्रंथाचे साखळी पारायण. संध्याकाळी ६ वाजता महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सोहळ्यात भाविकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन श्री. संत गजानन महाराज भक्त मंडळी शेंदुर्णी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.