राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0

जळगाव – : सरसकट दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करा, पीक विम्यांनी रक्कम त्वरीत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दि. ३० रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती पासून दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला .


.या मोर्चा मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे,माजी मंत्री गुलाबराव देवकर,अरुण भाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,रोहिणी खडसे , अशोक लाडवंजारी आदी सहभागी झाले होते. होते. मोर्चामध्ये ट्रॅक्टरर्ससह बैलगाडी घेवून शेतकरी सहभागी झाले होते. .

यांनतर मोर्चा जिल्हाधिकारी कायालयावर आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. बोंडअळीमुळे शेतकऱ्याचे नुकसान कापूस व केळी या रब्बी पिकांचे अवकाळी पाऊस व बोंडअळीमुळे प्रचंड नुकसान झाले असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. केळी पीकविमा काढतांना शेतकऱ्यांना प्रिमीयमची तारीख दिली जाते, मात्र त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कंपन्याव सरकार पळवाट काढत असल्याचे नेत्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.