बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायात टाकले; भाजप नेत्याचा मलिकांवर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. तसेच नवाब मलिक प्रकरणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप मलिकांच्या राजीनाम्यासाठी मागणी करत असताना मोहित कंबोजने पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मलिकांवर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचं स्पष्ट झालंय.

कंबोज यांनी मलिकांवर आरोप करत त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशेब मांडला. मलिकांना दहशतवादी संघटनांपासूनही पैसे मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पूजा ददलानी सोबत काय व्यवहार झाला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कंबोज यांनी केली. मलिकांचे ददलानीसोबत आर्थिक संबंध होते. ईडीने काल जो तपास केला, त्यात डान्सबारचा उल्लेख होता.

बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायात टाकण्याचे काम नवाब मलिक करत होते. माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत. ते मी व्हिडीओ समोर आणणार असल्याचं कंबोज म्हणाले. अंडरवर्ल्डशी संबंध, वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सची संबंध त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत कंबोज काय म्हणाले?

कंबोज यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की, कारवाईनंतर नवाबचा नकाब उतरताना देशाने पाहिले. राज्यातला आमदार, एका पक्षाचा प्रवक्ता यांचे संबंध 1993 च्या ब्लास्टमधील आरोपीशी आहे. झवेरी बाजारचा ब्लास्ट आम्ही पाहिला होता. अशा लोकासोबत याचे संबंध आणि पैशाचे व्यवहार देखील झालेत. याप्रकरणी पुढे पुढे आणखी गोष्टी उघड होतील. नवाब मलिक यांच्या जावयाला गांजा सोबत पकडलंं होतं. आंतरराष्ट्रीय ड्रग्स पेडलर आणि नवाब मलिक यांचे काय संबंध आहेत हे समोर यायला हवे. खोटे पेपर बनवून नवाब मलिकांनी कंपनीचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या भावना समजायला हव्या, राजकारण करू नये. 3 हजार कोटींची संपत्ती भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय टेरेरिस्टच्या माध्यमातून कमावली आहे. वरळी, वांद्रेतील घर असो, किंवा कुर्ला येथील शाळा असो याचा तपास केला पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.